गटविकास अधिकारी यांच्या आर्शिवादाने तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार?

गटविकास अधिकारी यांच्या आर्शिवादाने तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार?

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील जवळपास बर्याच ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगातील कामात अनागोंदी कारभार चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. बोगस व निकृष्ट कामे करून शासनाची दिशाभूल करत बीले उचलली जात आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायमध्ये 14 वित्त आयोगातील कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार होत असल्याच्या तक्रारी तालुक्यातील बर्याच गावात ऐकावयास मिळत आहेत हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे.

असाच एक प्रकार लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ ग्रामपंचायत कार्यालय येथील ग्रामविकास अधिकारी चलमले यांनी 14 वित्त आयोगातून करण्यात आलेल्या गावातील वळण रस्ता (रिंग रोड) व ग्रामपंचायत कंपाऊंड भिंतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी व बोगस असल्याचे ऐकावयास येत आहे या संबंधित कामाची चौकशी करण्यासाठी लातूरचे गटविकास अधिकारी एस एम गोडभरले यांच्याकडे लेखी तक्रार केली असता गटविकास अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहेत व तसेच तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे देणे, 14 वा वित्त आयोगाचा माझा काही संबंध नाही अशी दिशाभूल करणे अशी वाक्ये खुद्द गटविकास अधिकारी यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. दोन महिने झाले चिंचोली बल्लाळनाथ येथील कामाची चौकशी करण्याची मागणी केली असता तरीही अद्याप गटविकास अधिकारी यांनी कुठलीच दखल घेतली नाही. म्हणजे हे सर्व गटविकास अधिकारी यांच्या आशीर्वादानेच चालू आहे?, स्वता गटविकास अधिकारी ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

About The Author