शालेय विभागीय स्पर्धेसाठी किलबिलच्या अबुझर कुमठेकर ची निवड

शालेय विभागीय स्पर्धेसाठी किलबिलच्या अबुझर कुमठेकर ची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे नुकतिच जिल्हास्तरीय शालेय थाळीफेक स्पर्धा पार पडली. सदरील स्पर्धेमध्ये शाळेतील कुमठेकर अबुजर या विद्यार्थ्यांने सतरा वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. येणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. त्याला शाळेतील क्रीडा शिक्षक अभिजीत बी एल यांचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले, सचिन जगताप, अभिजीत बी एल व इरफान अकोले आदींनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!