ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने नागरीकांना कोरोना लसीकरण
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना माहामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या अगोदरच ग्रामपंचायत कार्यालयाकडून वेळोवेळी गावात फवारणी आणि गावातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले होते.
तसेच दि. १९ जुन रोजी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून गावचे सुपुत्र तथा किनगाव जिल्हा परिषद सर्कलचे जि.प सदस्य अशोक काका केंद्रे व माजी सभापती सौ आयोध्याताई केंद्रे यांनी पुढाकार घेऊन व सरपंच सौ .ज्योती माधव केंद्रे यांच्या प्रयत्नातून गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव यांच्या मार्फत कोरोनाची लस देण्याचा कार्यक्रम आयोजित केला यात पहिल्यांदा RTPCR चाचणी करून लसीकरण केले यावेळी आयोध्याताई केंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ सांगवीकर, डॉ . पांचाळ, डॉ.भालेराव ताई गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माधव केंद्रे तसेच गावातील ग्रामपंचायतच्या उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे नवनिर्वाचित सदस्य इंद्रायणीताई भानुदास केंद्रे, बाळू केंद्रे, भानुदास केंद्रे ,ग्रामसेवक मोहन केंद्रे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील 45 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. यावेळी गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.