महात्मा फुले महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

महात्मा फुले महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिना निमित्त दूरदृश्य (वॉटसअप ग्रुप) प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाला. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोरोना प्रार्दूभाव असल्यामुळे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी दि. १९ जून राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिना निमित्त विद्यार्थ्यांसाठी पीडीएफ ग्रंथ उपलब्ध करून दिले. हे ग्रंथ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आपापल्या विषयाच्या वॉटसअप ग्रुपवर विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पीडीएफ स्वरूपातील ग्रंथ उपलब्ध करून देऊन राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

About The Author

error: Content is protected !!