ओम साई मिञ मंडळ, तोंडार तर्फे दिपावली किट चे वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील मौजे तोंडार ग्राम पंचायत हद्दीतील हनमंतवाडी, करलेवाडी,गंडीपाटी,तोंडार पाटी,मुंडे वडी,तात्या कोटा येथे दिपावली निमित्ताने ओम साई मिञ मंडळ, तोंडार तर्फे दिपावली किट चे वाटप गोरगरिबांच्या घरोघरी जाऊन दिपावली भेट देण्यात आली.
यावेळी हनमंतवाडी येथील ग्रामस्थांनी ओम साई मित्र मंडळचे अध्यक्ष शिवकुमार पांडे व उपस्थित सदस्यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आले
हनमंतवाडी 70 ,करलेवाडी 50 ,गंडीपाटी 100 ,तोंडारपाटी 80,मुंडे वडी 25 ,तात्या कोटा 20 किटवापट करण्यात आले असुन यावेळी ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार पांडे,गृहनिर्माण ,ईतर मागास बहुजन कल्याण कक्ष अधिकारी माधव पटवारी, पत्रकार संगम पटवारी, तोंडार चे सरपंच भरत कोचेवाड,ग्राम सेवक कैलास खिंडे, गोंविद पांडे,प्रल्हाद पाटील, संग्राम भिंगोले,शंकर बिरादार, शिवलिंग नावंदे, नदुं स्वामी, निळकंट बिरादार ,राजू बिरादार, संदीप बिरादार,रामेश्वर बिरादार, हनंमतवाडी येथील विक्रम सुरवर,राम सुरनर,मनोहर सुरनर,उध्दव सुरनर आदी मान्यवर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
