भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांची अहमदपूर विधानसभा निवडणूक प्रमुख 2024 पदी नियुक्ती
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख असणारे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या वरती पक्षाने नवीन जबाबदारी सोपवली आहे गणेश हाके यांची महा विजय 2024 अहमदपूर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले. भाजपाचे नेते गणेश हाके यांची पक्षांमध्ये स्वच्छ प्रतिमा असलेला नेता म्हणून ओळख आहे. स्वार्थासाठी पक्ष सोबत गद्दारी कधी केली नाही. पक्षाशी प्रमाणिक राहून पक्ष वाढीसाठी योगदान दिले. याचबरोबर उच्चशिक्षित, अभ्यासू नेते म्हणून गणेश हाके यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यामुळे गणेश हाके यांच्यावरती पक्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवत असते अशातच आणखीन एक नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व कायम राहील असा विश्वास भाजप नेत्यांमध्ये आला आहे. या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, मा.आ बब्रुवान खंदाडे, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा अशोक केंद्रे, त्र्यंबक गुट्टे, माजी सभापती भारत चामे, ता. अध्यक्ष भाजपा प्रताप पाटील, वसंत दिघोळे ता. अध्यक्ष भाजपा चाकूर, मा ता अध्यक्ष हनुमंत देवकत्ते, हेमंत गुट्टे, डॉ सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, नितीन रेड्डी, बबलू पठाण, माणिक नरवटे तसेच सर्व भाजप कार्यकर्त्यांनी गणेश हाके यांचे अभिनंदन केले.
गणेश हाके
Ganesh Namdeorao Hake : AHMEDPUR (LATUR) Party: BJP, S/o|D/o|W/o: Namdeo Baburao Hake Age: 59, Name Enrolled as Voter in: Ahamadpur-236 (Maharashtra) constituency, at Serial no 456 in Part no 288, Self Profession:Retired, Farmer, Journisum, Spouse Profession:House Wife
Disclaimer: This information is an archive of the candidate’s self-declared affidavit that was filed during the elections. The current status of this information may be different. For the latest available information, please refer to the affidavit filed by the candidate to the Election Commission in the most recent election.