धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली
नितीन मंमाळे (उमरगा) : धाराशिव जिल्ह्यातील तालुका उमरगा येथे तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने येथील शासकीय विश्राम गृहात बैठक पार पडली.
त्यात सध्या राज्यात चालू असलेल्या घडामोडीवर सविस्तर चर्चा करण्यात आले. तसेच आरक्षण बचावासाठी राज्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना एकत्रित येण्याचे आव्हान करण्यात आले.
यावेळी डॉ.स्नेहा सोनटाके यांनी आपले मत मांडताना असे म्हणटले की,आरक्षण ही गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही , आरक्षण हे सामाजिक विषमता दूर करण्याची संविधानाने दिलेला विषय आहे. आपल्याला सहजासहजी आरक्षण भेटलेले नाही माननीय छगन भुजबळ साहेबांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंडळ आयोग महाराष्ट्रात लागू होण्यासाठी शिवसेनेच्या मोठ्या पदावर असताना राजीनामा दिला होता, तेच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन केले. पहिले आरक्षण 346 जातींना बाबासाहेबांनी दिले होते, त्यानंतर मंडल आयोगाने व्हि.पी. सिंग पंतप्रधान असताना ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेले आहे. भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे जनक आहेत, त्यामुळे सर्व ओबीसी समाजाला आव्हान करते की जातीचे राजकारण सोडून गट,तट,पक्ष बाजूला सोडून आपल्याला एक संघ यावे असे मत डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांनी मांडले, तसेच यावेळी येथे उपस्थितीत असलेले सर्वच मान्यवर आपआपले मत मांडले.
महा यलगार सभेची सुरुवात म्हणून शासकीय विश्रामगृहात आज बैठक पार पडली आहे. या बैठकीला डॉक्टर स्नेहा सोनकाटे, पंचायत समितीचे सभापती माननीय श्री सचिन पाटील साहेब, माजी नगरसेवक अब्दुल रजाक बाबुलाल अत्तर साहेब, विक्रम पाचंगे, अन्य ओबीसी समाजाचे मोठे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.