युवा परीवर्तन व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सनटेटर भेट
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील युवा परीवर्तन व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने कोरोनाच्या संकट काळात मदतीचा हात म्हणून उदगीर येथील दोन दवाखान्यांना रुग्णांच्या सेवेसाठी प्रत्येकी दोन प्रमाणे असे एकूण चार ऑक्सीजन काॅन्स्सेंट्रेटर नुकतेच भेट म्हणून देण्यात आले आहेत. एरिया मॅनेजर युवा परिवर्तन संस्था लातूरच्या मधुमती कनशेट्टे यांनी प्रत्येकी दोन प्रमाणे असे एकूण चार ऑक्सिजनचे काँन्सनटेटर भेट दिलेले आहेत. या मध्ये स्पंदन व चंन्द्राई या दोन दवाखान्याचा समावेश आहे. यापूर्वी पण सदरील संस्थेमार्फत कोरोनाच्या संकट काळात दोनशे कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे किट वाटप करण्यांत आलेले आहेत. युवा परिवर्तन ही संस्था सामाजिक क्षेत्रात 21 वर्षापासून कार्यरत आहे. युवा परिवर्तनाच्या माध्यमातून सामाजिक बेरोजगार, अल्पशिक्षित, शाळाबाह्य मुले, महिला बचत गट, यांना रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून त्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन, रोजगार करण्यास स्वावलंबी व सक्षम बनवते. यामध्ये शिकविले जाणारे कोर्सेस कॉम्पुटर, वायरमन, वेल्डर, फिटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, नर्सिंग इत्यादी अनेक प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. नेहमीच सदरील संस्थेचे संकट काळात उल्लेखनीय कार्य आहे. या वेळी कार्यक्रमाला मधुमती कनशेट्टे एरिया मॅनेजर युवा परिवर्तन संस्था लातूर, उत्तराताई कलबुर्गे, उषा माने, आरती सूर्यवंशी, शिवानंद सूर्यवंशी, रंजना बोडगे, भाग्यश्री बिरादार, सुमन पवार, विकास कांबळे, संतोष भुताळे, आरिफ सय्यद, उषा वाघमारे, संतोष भुताळे, विकास कांबळे, श्यामल उळागड्डे इत्यादी जण उपस्थित होते. त्याच प्रमाणे स्पंदन या हॉस्पिटल चे डॉक्टर सुनील माने, डॉक्टर मन्मथ देलमाडे, डॉक्टर नवनाथ सोनाळे, तसेच चंन्द्राई हॉस्पिटलचे सुधीर जगताप, डॉक्टर ज्योती मॅडम, व दोन्ही दवाखान्याचा स्टॉफ, कर्मचारी इत्यादी जण उपस्थित होते.