रामेश्वर बिरादार यांचा नव्या पिढीसमोर आदर्श – श्रीकांत पाटील
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील जकनाळ येथील सरपंच तथा सुप्रसिद्ध उद्योगपती रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी शुन्यातुन विश्व उभारून एक आदर्श निर्माण केला आहे. नव्याने उद्योगधंद्यात येणाऱ्यांना रामेश्वर बिरादार यांचे उदाहरण एक आदर्श म्हणूनच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील व्यवसाय कसा करावा? हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. असे विचार चंदरआण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले. रामेश्वर बिरादार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा सत्कार सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उदगीर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, मादलापूरचे सरपंच उदयभाऊ मुंडकर, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष ताहेर हुसेन, उद्योगपती दर्शन चवळे, शिवसेनेचे नेते श्रीमंत सोनाळे, छावाचे अध्यक्ष दत्ता पाटील, बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा. सिद्धेश्वर पटणे, रत्नागिरी केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रदीप वीरकपाळे, काँग्रेसचे नेते बालाजी पाटील, शकील भाई सय्यद, बामणी चे सरपंच राजकुमार बिरादार, जानापूर चे सरपंच कल्याणराव बिरादार, चेअरमन शिवाजीराव पाटील, नळगीर चे माजी सरपंच संगम शेटकार, अशोक कांबळे, सना उल्ला खान, चिंतामणी बिरादार, हरिश्चंद्र वट्टमवार, तानाजी जाधव, कल्याण बिरादार, संतोष सुर्यवंशी, अजित फुलारी, अमर चिंचोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, रामेश्वर बिरादार हे लोकनेते चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सहभाग घेतात. मनमिळावू स्वभाव आणि काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे. नव्या उद्योजकांनी त्यांचा आदर्श घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संयोजक या नात्याने श्रीकांत पाटील यांनी केले.