आमदार बाबासाहेब पाटील यांचे जागतिक योग दिनानिमित्त योगासन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील आज शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी नित्यनियमा प्रमाणेच आजही ‘ जागतिक योग ‘ दिनानिमित्त अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी योग दिन साजरा केला. योगासने हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाच्या या काळात सर्वांनी योग करून आपले आरोग्य सांभाळावे. तसेच “आंतरराष्ट्रीय योग दिन” हा केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस न राहता आपल्या सगळ्यांची दैनंदिन योगाकडे वाटचाल घडवणारा ठरायला हवा, असे यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगीतले. यावेळी सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील साहेब, प्रा. द. मा.माने आदी उपस्थित होते.