प्रमोद शिंदे यांचे ऱ्हदय विकाराने दु:खद निधन
अहमदपूर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त बांधकाम अभियंता प्रशांत शिंदे व महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता शिंदे यांचे लहान बंधू प्रमोद शिंदे यांचे तीव्र अटॅक येऊन दु:खद निधन झाले असून आज त्यांच्यावर सार्वजनिक स्मशानभूमी येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मोठे भाऊ, पत्नी, दोन बहिणी, एक मुलगा,मुलगी, तीन भावजया,पुतने असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी च्या वेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव,भाजपा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, ॲड.कीशनराव बेंडकुळे, देशमुख, प्रा.सुधीर जगताप,प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.