जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी कापसे तर कार्यवाह म्हणून राम मेकले यांची बिनविरोध निवड.
लातूर (एल.पी.उगीले) :- लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सन 2023 – 26 कार्यकाळासाठी अध्यक्ष पदी प्रभाकर कापसे, कार्यवाह पदी राम मेकले,कार्याध्यक्ष डाॅ.ब्रिजमोहन झंवर, उपाध्यक्ष युवराज जाधव, सहकार्यवाह काशिनाथ बोडके,तर कोषाध्यक्ष पदी राम मोतीपवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शनावार दि.१३जानेवारी २०२४ रोजी हुतात्मा स्मारक येथे हावगीराव बेरकीळे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी अॅड.संतोष गिल्डा यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.सर्व संचालक यांनी डाॅ.ब्रिजमोहन झंवर यांना या निवडीचे अधिकार दिले व सर्वांशी चर्चा करून डाॅ.ब्रिजमोहन झंवर यांनी वरीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली.
या बैठकीस संचालक, विविध वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम मेकले यांनी केले सुत्रसंचालन जहांगीर सय्यद यांनी तर आभार अनिल पाटील यांनी मानले.