अहमदपूर येथील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे,अन्यथा कार्यालयात कोंडणार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुका हा खूप मोठ्या जनसंख्येचा तालुका असून दिवसभर जनता,शेतकरी, महिला,विद्यार्थी यांच्या झुंडी च्या झुंडी विविध कार्यालयांमध्ये जात असतात परंतु अधिकारी, कर्मचारी न भेटल्याने त्यांना रोज ग्रामीण भागातून ये जा करून ,वाहन भाडे भरून खेटे मारावे लागत आहेत.त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यात दिरंगाई होत आहे.जर अधिकारी च लातूरला घर करत असतील तर ते कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याविषयी आदेश कसा काढू शकतील असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी उपस्थित करत त्यांच्या कडे जनतेच्या याविषयी आलेल्या तक्रारींमुके त्यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या व शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला कार्यालयात कोंडवणार आहे असा इशाराही दिला आहे व या संदर्भात उपजिल्हाधिकारी मा.प्रवीण फुलारी साहेब यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत अश्या कामचोर अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश काढावे असे निवेदन दिले आहे.यावेळी तालुकासचिव मदन पलमटे, मंचक सूर्यवंशी, शिवराज कासले, वैजनाथ पिटाळे,राजकुमार कंदे, नितीन पलमटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.