टेनिस बॉलच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक सचिन हुडे यांच्या हस्ते संपन्न

0
टेनिस बॉलच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक सचिन हुडे यांच्या हस्ते संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर तालुक्यातील कुमठा येथे टेनिस बॉलच्या भव्य क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन युवा उद्योजक सचिन हुडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनीलभाऊ केंद्रे, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, अशोक केंद्रे, रवी बिरादार, रामदास जाधव, विश्वनाथ केंद्रे, शिवाजी केंद्रे, सय्यद पाशा, बिरादार माधव, सलीम अत्तर, बालाजी घुगे, मुन्ना बिरादार, दीपक जाधव, बबन सुरवसे, जमीर शेख, अर्जुन केंद्रे, दयानंद नक्षत्रे, संतोष रणक्षेत्रे, निळकंठ तलवारी गावातील व परिसरातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सूत्रसंचालन तुळशीदास जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन दिलीप गुरुजी केंद्रे यांनी केले. या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक (51,000) सुनील भाऊ केंद्रे, द्वितीय पारितोषिक (25000) संतोषभाऊ हरमुंजे, तृतीय पारितोषिक( 11000) महेश्वर स्वामी,(5555) प्रमोद देविदासराव केंद्रे (5000) ज्ञानेश्वर पाटील बेस्ट बॅट्समन बेस्ट 2100, 2100 बेस्ट बॉलर,2100 कीपर, 2100 ,2100षटकार, कॅच, 2100 फिल्डर, 2100मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस वितरण होणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमींनी या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा लाभ घ्यावा. अशी आवाहन अतुल केंद्रे यांनी केलेले आहे.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सर्व खेळाडूंना उद्घाटक सचिनभाऊ हुडे यांनी शुभेच्छा दिल्या. सुनील भाऊ केंद्रे यांनी तरुणांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक विकासासाठी खेळ हा खूप उपयुक्त आहे. आज जातीय, धार्मिक जे तेढ निर्माण होत आहे, त्यासाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी बंधुभाव जपण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या पलीकडे ऋणानुबंध जपण्यासाठी खेळ हे माध्यम खूप महत्त्वाचे आहे. या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय एकोपा जोपासला जातो. युवा पिढी देशाचा आधारस्तंभ असतो व खेळाच्या माध्यमातून तरुणाई आपल्या गावचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे तसेच देशाचे नाव जगभर करते. म्हणून खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. असे सांगितले, तसेच गावोगावी स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत असे आवाहन सुनील केंद्रे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *