जिल्हा परिषद शाळा नागतिर्थवाडी येथे आनंद नगरी
उदगीर (एल.पी.उगीले) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागतिर्थवाडी येथे खरी कमई या उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना व्यापार, व्यवहार व व्यवसाय याचा प्रत्यक्ष अनुभव यावा, पैश्याची देवाण घेवाण करता यावी. यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपआपल्या घरून विविध खाद्य पदार्थ, भाजीपाला व शैक्षणिक वस्तू आणुन प्रत्येकानी एक एक दुकान लावून ते मुबलक दरात गावकऱ्यांना विकल्या.
त्यातून त्यांचे व्यवहारिक गणित व हिशोब सुबक होण्यास मदत झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी चिवडा, चकली, पोहे, सुशिला,खिचडी,दही धपाटे,आपे, कांदा भजे, वडापाव, कचोरी, समोसे, ढोकळा, पपई, शेंगा लाडू,बर्फी, चहा, बिस्कीट, कुरकुरे हे खाद्य पदार्थ तर भाजीपाला मध्ये वरण्याच्या शेंगा व वांगी आणि शैक्षणिक साहित्यात पेन, वही, पेन्सिल, खोड रबर इत्यादी वस्तू आणल्या होत्या.
त्या विक्री करून विद्यार्थ्यांना चांगला नफा ही मिळाला. त्यात जास्त विक्री करणाऱ्यास पहिला,दुसरा व तिसरा क्रमांक ही काढण्यात आला. त्यांना 26 जानेवारी रोजी बक्षीस देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास खरेदी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावच्या सरपंच सौ. कोमल गुणाले, शाळा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे, उपाध्यक्षा सौ. अनुराधा बुगे,माजी सरपंच राज गुणाले,माजी सरपंच तुकाराम पाटील,ग्रा.प. सदस्य स्वाती कासले,अंगणवाडी शिक्षिका पंचफुला गुणाले, मदतनीस पार्वतीबाई उंचे, माथूराबाई गिरी यांच्या सह विद्यार्थ्यांचे पालक, बचत गटाच्या महिला, गावातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन, रूपरेषा व यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अश्विनीकुमार गुंजरगे आणि सहशिक्षिका अमरजा शिरुरे यांनी मेहनत घेतली.