अहमदपूर शहर व तालुक्यातील योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील पतंजली परिवार व नगर परिषद यांच्या वतीने साजरा झालेला योगदिन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने खरोखरच “आंतरराष्ट्रीय” झाला. पहाटे साडेपाच ते सात या वेळात गुगलमीट वर योगरत्न डाॅ मेजर मधुसूदन चेरेकर यांच्या योगवर्गात अमेरिका, कॅनडा, यूएई,भारत,नेपाळ,बांग्लादेश व आॅस्ट्रेलिया या सात देशातील विद्यार्थी उपस्थित होते. हे सत्र पुणे येथील दिलीप मोदी व नांदेड येथील बापूराव मोरे यांनी आयोजित केले होते. शहरातील प्रमुख कार्यक्रम नगराध्यक्षा सौ सौ.अश्विनीताई व श्री. लक्ष्मीकांत कासनाळे यांच्या पुढाकाराने सकाळी सात ते आठ श्रीराम जानकी भुवन येथे घेण्यात आला. त्यास तहसीलदार श्री. प्रसाद कुलकर्णी, वैद्यकीय अधिक्षक श्री. दत्तात्रय बिराजदार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री.गणेश हाके, तालुका अध्यक्ष श्री. हणमंत देवकत्ते, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री.शिवानंद हेंगणे, डॉ वर्षा भोसले, डॉ मनकर्णा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. बालाघाट अभियांत्रिकी महाविद्यालयात श्री.अनिल चवळे व सौ.वृषाली चवळे यांनी योगसत्र घेतले.यावेळी श्रीमती रेखा तरडे या उपस्थित होत्या. लांजीच्या माजी सरपंच श्रीमती आग्नेला यांनी दक्षिण अमेरिकेतील गुयाना येथे प्रत्यक्ष तसेच गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमती सुषमा येणगे यांच्यासोबत आभासी योगसत्र घेतले. श्रीमती शीला कोंगे यांनीही उत्तर भारतीयांसाठी आभासी योगसत्र घेतले. तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे पतंजली परिवाराच्या वतीने योगसत्र घेण्यात आले. यांमध्ये योगाचार्य श्री शिवमूर्ती भातांब्रे, सौ.कलावती भातांब्रे, सौ.प्रेमा वतनी, तालुका संरक्षक श्री ओमप्रसाद सोनी, श्री.गौरव चवंडा यांच्या मार्गदर्शनात श्री. सचिनजी कोंडलवाडे,श्री.सागर व सौ अंजली कुलकर्णी, श्री.शुभम ठाकूर, सौ पुष्पा ठाकूर,सौ विशाखा तांदळे, सौ.दयावती हिंगरुपे, सौ.उषा गोजमे, श्री. प्रमोद कुलकर्णी, श्री.विकास राठोड, श्री. विशाल डूब्बेवार, श्री.केशव मुंडकर, सौ.स्नेहा मुंडकर,सौ.कौशल्या पवार यांनी सहभाग घेतला. जळकोट व चाकूर तालुक्यातही अहमदपूरच्या शिक्षकांनी योगसत्रे घेतली. ओंकार गादगे व डाॅ चेरेकर यांनी लातूर,यवतमाळ व धर्माबादच्या साधकांसाठीही आभासी योगसत्रे घेतली. औरंगाबाद येथील एका वाहिनीने यानिमित्त डाॅ चेरेकर यांची एका तासाची मुलाखत प्रसृत केली आहे.