योगा नित्य जीवन क्रम बनावा – श्रीमती तृप्ती पंडित
उदगीर (प्रतिनिधी) : शारीरिक आरोग्य सोबत मानसिक स्वास्थ्य कायम टिकून राहण्यासाठी योगासने रामबाण आहेत. सध्याच्या काळात सर्वांचे जीवन धावपळीचे बनले असून या जीवन शैलीमुळे अनेक व्याधी माणसाला लागल्या आहेत. यापासून सुटका होण्यासाठी केवळ एक दिवस योगा करून चालणार नाही तर योगा हा नित्य जीवन क्रम बनावा. असे विचार शामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती पंडित यांनी व्यक्त केले. त्या शामार्य कन्या विद्यालयात आयोजित योगा दिनाच्या निमित्ताने अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मोहिनी आचोले या होत्या. विद्यार्थिनींना योगाचे प्रात्यक्षिक ज्येष्ठ शिक्षक एस बी कुदळे यांनी करून दाखवले. डॉ आचोले यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.