अतुल बानापुरे यांचा सत्कार संपन्न

अतुल बानापुरे यांचा सत्कार संपन्न

रेणापूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील मोजे धवेली तालुका रेनापुर येथील रहिवासी अतुल नरसिंग मानापुरे यांची सहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश आप्पा कराड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.अतुल बानापुरे हे हिंगोली येथे सहाय्यक आरटीओ बनले आहेत. त्या बद्यल ग्रामस्थांना आनंद झाला.त्या प्रित्यर्थ सत्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी रेनापुर भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड दशरथ सरवदे, संजय बानापुरे, औशाचे माजी नगराध्यक्ष किरण आप्पा उटगे, सतीश आंबेकर, वसंत करमुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author