अर्चना मस्के यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर
पुणे (रफिक शेख) : पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या अर्चना लक्ष्मण म्हस्के यांच्या कार्याची दखल आनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने घेतली आहे. समाजासाठी सकारात्मक काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सात कर्तबगार महिलांना दिला जाणारा राजमाता जिजाऊ स्मृती पुरस्कार अर्चना म्हस्के यांना जाहीर केला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातील ज्योती नगारे पाटील (इचलकरंजी), मालन धावजी पाटील (भडगाव), दिपाली भिकन गुरव (पेठ नाका) ,कल्पना लक्ष्मण जाधव (बारामती), अर्चना बचाराम नीलकंठ (तनवडी), रोहिणी सुभाष भोसले (कागल) असे इतर कर्तबगार महिलांची नावे आहेत. संस्थेच्या वतीने महाराष्ट्रात जिजाऊंचा आदर्श ठेवून आपले कार्य समाजासाठी प्रामाणिकपणे करणाऱ्या कर्तबगार महिलांची निवड केली जाते. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, महिला व बालकल्याण, कृषी, संरक्षण, पोलीस इत्यादी क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या महिलांची निवड केली जाते. संस्था दरवर्षी अशा महिलांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करून पुरस्कार देऊन गौरवित असते. अशी माहिती संस्था संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव, अध्यक्ष माधुरी खोत, सचिव आरुना पाटील आणि पुरस्कार निवड समिती महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने अर्चना म्हस्के यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे शहर आणि परिसरात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.