राज्यमंत्री ना.श्री.संजय बनसोडे यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन
उदगीर (प्रतिनिधी) : गुडसुर पंचायत समिती गणातील डोंगरशेळकी, कल्लूर आणि गुडसुर येथे राज्यमंत्री नामदार संजय भाऊ बनसोडे यांनी मंजूर केलेल्या डोंगरशेळकी येथे मूलभूत विकास योजनेअंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे-10 लक्ष रु आणि जनसुविधा योजना निधी अंतर्गत पेवर ब्लॉक बसविणे-10 लक्ष रु, कल्लूर येथे मूलभूत विकास योजनेअंतर्गत सी सी रोड करणे-10 लक्ष रु आणि गुडसुर येथे मूलभूत विकास योजनेअंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे-10 लक्ष रु अशा विविध विकास कामांचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कल्याण पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयभैया निटूरे,पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. शाम डावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विनोबा पाटील, नामदेव बिरादार, बाजार समितीचे संचालक अनिल लांजे, माजी सरपंच व्यंकटराव मरलापल्ले, चेअरमन व्यंकटराव मरेवाड, डोंगरशेळकीचे सरपंच सौ. नागरबाई कांबळे, उपसरपंच गणपत पवार, गुडसुर चे सरपंच उत्तम सूर्यवंशी, उपसरपंच बालाजी देमगुंडे, कल्लूर चे सरपंच निवृत्ती बाजगीर, बन्सीधर पाटील, बब्रुवान कुंडगिर, लिंगराम नादरगे, उशाबाई पुंड, बी एन मुंडे सर, सुनीता जाधव, राजपाल खंदाडे, रमेश गोमारे, संग्राम मरलापल्ले,नरसन मरेवाड, कालिदास दांडिमे, शैलेश देमगुंडे, अजय कुलकर्णी, नामदेव खंदाडे, थोडगे, कोनाळे, चंद्रकांत मुंडे, राहुल पुंड, राहुल गजभारे, सूरज नादरगे, अभिषेक बरुरे, आकाश मरलापल्ले, शरद पुंड, सुमेध कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.