मुसा नगर येथे ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशनच्या वतीने महिला पालक मेळावा
उदगी (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील मुसा नगर येथे ऑल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशनच्या वतीने महिला पालक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सध्याच्या शिक्षण पद्धतीवर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत गेल्या अनेक दिवसांपासून शाळा पूर्णपणे बंद असून शाळा बंद असल्याने मोठया प्रमाणात विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
सध्या विध्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू असली तरी प्रत्येक पालकांना ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांना मोबाईल घेऊन देणे शक्य नसल्याने गरीब कुटुंबातील मुले आजही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. गरीब कुटुंबातील मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नये, जर आपल्या शेजारी गरीब कुटुंबातील मुले असतील तर त्यांना आपल्या मुलांसोबत ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच आपली मुले मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेत आहेत किंवा नाही? यांचीही पालकांनी खात्री करावी. असे या पालक मेळाव्यात चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सचिव अझरोद्दीन शमशोद्दीन शेख, अध्यक्ष राजापटेल अब्दुल हई, माजी मुख्याध्यापक ठाणेदार मुर्तूजा,पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, पोलीस उपनिरीक्षक खेडकर, लातूर जिल्हाअध्यक्ष हाशमी सय्यद वसी, जमात-ए-इस्लामी उदगीर युनिट चे अध्यक्ष दायमी रहीम, सॉफ्टवेअर इंजिनीयर खुरैशी मोहम्मद फजलुर्रहेमान, हाफेज शेख मुदसिर यांची या महिला पालक मेळाव्यास उपस्थिती होती.