राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही
लातूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर २०२० संपूर्ण महिन्याच्या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मा. कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, मा. जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत तसेच नूतन जिल्हाधिकारी मा. श्री. बी. पी. पृथ्वीराज आणि मा. विभागीय उप- आयुक्त श्री. पवार साहेब, अधीक्षक श्री. गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हयात अवैध बेकायदेशीर मद्यविक्री, निर्मिती व वाहतुक या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही नोंदवत दि. २९/१२/२०२० पर्यत एकूण ५१ गुन्हे नोंद केले यामध्ये आरोपी ४८ इसमांना अटक करण्यात आली असून सदर नोंदविलेल्या गुन्हयात २७७ लीटर देशी दारुचा मद्यसाठा, ११६ ली. विदेशी मद्यसाठा, २४० ली. हातभटटी आणि २९०० ली. हातभटटी बनविण्याचे रसायन तसेच दोन दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्येमालाची किंमत ११, ४६,२७०/- एवढी आहे.
सदर कारवाईत लातूर विभागाचे निरीक्षक श्री. आर. एम. बांगर, उदगीर विभागाचे निरीक्षक श्री. एम. एन. झेंडे, लातूर विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. आर. जी. राठोड, उदगीर दुय्यम निरीक्षक श्री. बी. के. अवचार, श्री. डी. एस. पाचपोळे, स. दुय्यम निरीक्षक श्री. गणेश गोले, श्री. अनंत कारभारी, जवान श्री. जे. आर. पवार, श्री. एस. एस. साळुंके, श्री. अनिरुध्द देशपांडे, श्री. निलेश गुणाले, श्री. हणमंत मुंडे तसेच भरारी पथक विभागातील निरीक्षक श्री. शेख, दु. नि. श्री. काळे यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. अवैध दारुविक्री अथवा वाहतुकीवरील कार्यवाही यापुढेही चालु राहणार असल्याचे श्री. गणेश बारगजे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगीतले असून अवैध व परराज्यातील मद्यविक्री, वाहतूक होत असल्यास त्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.