महिला विषयक कायद्याच्या जनजागरणाची आवश्यकता
देवणी (प्रतिनिधी) : महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्याचे जनजागरण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ॲड. शिवानंद मळभगे यांनी केले. कै. रसिका महाविद्यालय देवणी व मौजे आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे उपस्थित होते. ग्रामीण व शहरी भागातील वाढत चाललेले अंतर कमी करण्यासाठी महाविद्यालयातील युवकांनी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत जावळे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सौ. मुक्ताबाई सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य श्री. व्यंकट शिंदे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांची उपस्थिती होती. यावेळी कु. दिव्या तादलापुरे व कु. अंजली स्वामी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरादरम्यान आपल्याला आलेले अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रमाधिकारी डॉ. विजय मोरे, सदस्य डॉ. सुलोचना डेंगाळे, डॉ. वैशाली चटगे, प्रा. धनराज बिराजदार प्रा. शुभम जाधव राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा सुरवसे व समीर शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिबिरार्थी विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. आर. मोरे यांनी केले आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. गोपाल सोमाणी यांनी व्यक्त केले.