हावगीस्वामी मठाचे मठाधीश श्री. शंभुलिंग महाराज यांच्या वाढदिवसा निमित्य अभिष्टचिंतन करून चंदरअण्णा प्रतिष्ठाणने घेतले आशीर्वाद 

हावगीस्वामी मठाचे मठाधीश श्री. शंभुलिंग महाराज यांच्या वाढदिवसा निमित्य अभिष्टचिंतन करून चंदरअण्णा प्रतिष्ठाणने घेतले आशीर्वाद 

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर नगरीचे ग्रामदैवत श्री. हावगीस्वामी मठाचे मठाधीश श्री. शंभुलिंग महाराज यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमीत्त चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी सहकार महर्षी विरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांतअण्णा वैजापूरे यांच्या उपस्थितित. श्री. शंभुलिंग महाराज यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना अभिष्टचिंतन करून त्यांचा आशीर्वाद प्रतिष्ठाणच्या सर्व पदाधिकारी, भक्तांनी घेऊन सत्संग साजरा केला. सर्व उपस्थित भक्तांनी शुभेच्छा दिल्या. 

  यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई काबंळे, नगरसेवक नागेश अष्टुरे, भाजपाचे अमोलजी निडवदे, प्रमोद शेटकर, इंजीनिअर कल्पे, उद्योगपती रामेश्वर बिरादार जकनाळकर, पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर, रविद्रं हसरगुंडे, अशोकराव एकुर्केकर, उमेश भातांब्रे, उमाकांत सुंदाळे, हरिशचंद्र वट्टमवार, शिवा उप्परबावडे, शिवशंकर खड्डे, अजित फुलारी, महेश देशमुख, कपिल शेटकर, कल्याण बिरादार, धोंडिबा सुगावकर, उद्योगपती विमलताई गर्जे, वारकरे काकु,फुल्यामावशी घोणे, सुर्यवंशी काकु, स्वामी ताई, प्रेमला हेरकरताई, उत्तराताई कलबुर्गे, श्यामला ताई कारामुंगे, अनिता नेमताबादे, बबिताताई पाढंरे, जिवणे मॅडम, विकास नगर येथील सर्व महिला उपस्थित होत्या. या सत्कार समारंभा प्रित्यर्थ मठाधिश शंभुलिंग महाराज यांनी सर्वांना शुभआशीर्वाद दिला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!