मोतिबींदू मुक्त तालुका अभियान यशस्वीपणे राबवू – तहसीलदार रामेश्वर गोरे
उदगीर (प्रतिनीधी) : मोतीबिंदू हा डोळ्याचा एक प्रमुख आजार आहे.मोतीबिंदू मुळे प्रकाश दिसत नाही. त्यामुळे दृष्टी मंदावली जाते. त्यामुळे अस्पष्ट दिसायला लागते. मोतीबिंदू हा एका किंवा दोन्ही डोळ्यांना होऊ शकतो. अंधत्वाचे मोतीबिंदू हे एक प्रमुख कारण आहे.काही बालकांमध्ये जन्मजात मोतीबिंदू ही आढळून येतो.तसेच वाढत्या वयोमानसोबातच, सतत उन्हात काम केल्याने, धूम्रपान, मद्यपान यांच्या व्यसनामुळे तसेच स्मार्टफोन यांच्या अतिवापरामुळे मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे उदगारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगीतले.ते उदयगीरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे चष्मे वाटप कार्यक्रमाचे दरम्यान बोलत होते.
यावैळी मंचावर उपस्थित नेत्ररूग्णालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया ,नेत्र चिकित्सक डाॅ. पवार, डाॅ.सुप्रीया पाटील,डॉ.स्वपनील शिंदे,डाॅ.कुंभारे,एस.एस.पाटील, शिबिर समन्वयक गणेश मुंडे,हजारे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अंधमुलांनी स्वागत गीताने केली. नेत्ररुग्णालयाच्या वतिने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना गोरे म्हणाले, उदगीर तालुक्यातील मागील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी अंधत्वमुक्त तालुका अभियाना सुरू केलेली मोहिम कोरोना महामारीत थांबली होती. ती पुर्वरत सुरू होत असुन आपण सर्वजन एकत्रीपणे मोतीबिंदू मुक्त अभियान राबवू, त्यासाठी उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्णालयाने या बाबतीत माहीती कळवावी, त्या पध्दतीने कामाला सुरुवात करूण, लागेल ते सहकार्य करू, असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.पाटील यांनी केले तर आभार गायकवाड प्रशांत यांनी मानले. यावेळी शस्त्रक्रिया रुग्ण,नातेवाईक सोबतच अंधशाळेतील मुले ही कार्यक्रमाला उपस्थित होते.