मराठा आरक्षणासाठी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक 

मराठा आरक्षणासाठी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक 

उदगीर (एल. पी.उगिले) : देशाच्या पंतप्रधानांनी मराठा समाजातील युवकांचे भवितव्य घडवावे. त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी मराठा आरक्षणाला हातभार लावावा, अशी मागणी करणारे शेकडो पत्र लातूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष चंदनभैय्या बसवराज पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आली. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात मराठा समाजाच्या युवकावर अन्याय होऊ नये. मराठा आरक्षणासाठी महाआघाडी सरकार सकारात्मक असून केंद्र सरकारने त्यांच्या अधिकारातील पदाचा वापर करून मराठा आरक्षण मिळवून द्यावे अशी विनंती केली आहे.

एका बाजूला या नाहीतर त्या कारणाने प्रचंड बेकारी वाढत असताना कित्तेक युवक नोकरीसाठी असलेली वयोमर्यादा ओलांडून जात आहेत. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा. अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळकर यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मराठा समाजातील युवकांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. केंद्र शासनाने मराठा समाजातील युवकांना न्याय द्यावा. या मागणीसाठी वेळ प्रसंगी आंदोलन ही करावे लागले तर त्याचीही आम्ही तयारी ठेवू, अशीही भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या आठ दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजातील युवकांच्या भवितव्यासाठी मराठा आरक्षणाचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे.

About The Author

error: Content is protected !!