गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे (केशव नवले) : पुणे शहरातील आणि परिसरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून फरार असलेल्या आरोपींना पकडण्या मध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने विशेष सापळा रचून अटक केली आहे.

 यामध्ये गौरव सुरेश कांबळे, फरदीन मज्जित खान, प्रथम विनोद ससाने, सिद्धार्थ डेव्हिड सिंग या चौघांच्या संदर्भात गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, पोलिसांच्या यादीमध्ये पाहिजे असलेले गुन्हेगार म्हणून गौरव आणि फरदीन यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांच्यावर खडक पोलीस स्टेशन, दत्तवाडी पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

 विशेष म्हणजे कोथरूड पोलीस स्टेशन येथे खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेले आरोपी सापडल्याने सदरील गुन्हा उघड होण्याची शक्यता निर्माण झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलिसांना हवे असलेल्या गुन्हेगारांची माहिती काढत असतांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील कर्मचारी निलेश शिवतारे आणि सुमित टाकपेरे यांना माहिती मिळाली की, कोथरूडच्या गुन्ह्यात हवा असलेला गौरव गुरुवार पेठेत थांबला आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात कल्पना देऊन सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी चौघेजण सापडून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 सदरील सापळा अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस कर्मचारी निलेश शिवतारे, अतुल मेंगे, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, सुमित टाकपेरे यांच्या पथकाने काम केले. पोलिसांच्या धडाकेबाज मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About The Author