देवणी कडकडीत बंद,बोरोळ चौक जाम

0
देवणी कडकडीत बंद,बोरोळ चौक जाम

देवणी कडकडीत बंद,बोरोळ चौक जाम

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी तालुक्यातील वलांडी येथील सहा वर्षे वयाच्या नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याबद्दल त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. हिंदू खाटीक समाजातील सहा वर्षाच्या मुलीवर मुस्लिम समाजातील अल्ताफ खुरेशी (वय विस वर्ष), या नराधमाने नाबालिक मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या तरुणाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, व फास्ट ट्रॅक पद्धतीने खटला चालउन लवकरात लवकर पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करणारे निवेदन गुरुवारी दि 1/2/2024 रोजी बोरोळ चौकात नायब तहसीलदार राहुल पत्रिके व मंडळाधिकारी अनिता ढगे यांना देण्यात आले.यावेळी मनोहर पटणे , सदाशिव पाटील तळेगावकर , यशवंत पाटील , दिलीप मजगे , अनिल कांबळे, आनंद जिवणे, सोमनाथ लुल्ले , बालाजी वळसांगविकर,अटल धनुरे, अजित बेळकुणे, रमेश मनसुरे, सोमनाथ कलशेट्टी, धनराज बिरादार, रंजना पोलकर, सुप्रिया कांबळे , नरसिंग सुर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, दिपक स्वामी , विजयकुमार लुल्ले, संजीव जिवणे, भिमसेन जानापुरे, उद्धव गौडगावे,आकाश संते,नरेश मोदी, संजीव पटणे, किशोर बिरादार, कृष्णा इंगोले, तसेच श्रमिक क्रांती अभियान या संघटनेचा जाहीर पाठींबा या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष डी एन कांबळे, जिल्हाध्यक्ष गजानन गायकवाड उपस्थित होते. मोर्चासाठी देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यानी चौख बंदोबस्त ठेवला होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *