राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रोहीना ता. चाकुर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रोहीना ता. चाकुर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न
लातूर (एल.पी.उगीले) : रोहीना ता. चाकुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी मंत्री विनायकराव पाटील व जिल्हाध्यक्ष संजयजी शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाच्या ध्येयधोरणांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व शरदचंद्रजी पवार यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी, माता,भगिनी मोठ्या संखेने आणि प्रचंड उत्साहात उपस्थित होते.
यावेळी अहमदपुर-चाकुर मतदार संघातील विविध सेल च्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रोहीना-अंबिका गावचे माजी सरपंच मच्छिंद्र नागरगोजे यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते सय्यद साजिद भाई, उदगीर पं.स. चे माजी सभापती शिवाजीराव मुळे, चाकुर बाजार समिती चे सभापती निळकंठराव मिरकले, युवती जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहाताई मोटे, सोमेश्वर कदम, चाकुर तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे, अहमदपूर तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, श्रीमंत भाऊ शेळके, निळकंठ पाटील, शिवानंद भोसले, अमोल शेटे, अजित खंदारे, दयानंद सुर्यवंशी, व्यंकटराव पाटील, बाबुभाई दापकेवाले, आबासाहेब माने, राजीव खंदाडे, प्रशांत पाटील, अभिमन्यू धोंडगे, परमेश्वर घोगरे, केरबा कांबळे, भागवतरावजी, चंद्रकांत नरवोड, बाळासाहेब भताने, बालाजी पाटील जवळगेकर, तुकाराम मारापल्ले, सुनील चिंताले, प्रा. भीष्मनारायण केंद्रे, भुजंगराव केंद्रे, गणपतराव केंद्रे, भागवत केंद्रे, सरपंच वैजिनाथ जिवलगे, बाबुराव केंद्रे, रमेश मुंडे, पंडित केंद्रे, अनिल नागरगोजे, हनुमंत केंद्रे, उत्तम केंद्रे, मधुकर वाघमारे, बालाजी डोंगरे, राहुल केंद्रे, किशोर मळभागे, अंतेश्वर वाघमारे, विलास कांबळे. आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था सह इतरही निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करून पक्षाची ध्येय धोरणे मजबूत करून सर्वसामान्य माणसांना पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आणि पक्षाचे ध्येय धोरण केवळ पदासाठी वापरून संधी साधून पक्षाचा गैरफायदा घेऊन, इतर पक्षाच्या पंगतीला जाऊन बसलेले नेते, आणि कार्यकर्ते यांच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मोठया हिमतीने आगामी निवडणुकात सक्रिय राहावे असे आवाहन करण्यात आले.
