२१ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे दर्जेदार शिक्षण देणारे सर्वोत्तम क्लास

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात २१ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे दर्जेदार शिक्षण देणारे सर्वोत्तम क्लास म्हणून परिचित असलेल्या ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्यावतीने ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स ऑनलाईन पद्धतीने घेतला जात आहे.
आजपर्यंत केवळ विद्यार्थी शिकत होते परंतु आता विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंब शिकत आहे.
त्यामुळे ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून, विविध भागातून विद्यार्थी, गृहिणी, शिक्षक, डॉक्टर अधिकारी इंग्रजीचे धडे घेत आहेत.

मागील जवळपास दीड वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
पुढील तयारीसाठी मुले असे जाणार? शिक्षण क्षेत्रातील किंबहुना अभ्यासातील पडलेला एवढा मोठा गॅप कसा भरून काढणार? ही बाब लक्षात घेऊन ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीचे संचालक प्रा. सच्चीदानंद ढगे सर आणि प्रा. विवेकानंद ढगे सर यांनी विद्यार्थ्यांची हित लक्षात घेता ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना फलदायी ठरेल असा वापर करून ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स ऑनलाईन पद्धतीने सुरू केला. यामध्ये प्रा. ढगे सर यांनी सलग चार-चार तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये दर्जेदार व महत्वपूर्ण बाबी शिकविण्यात आल्या. नोट्स, साहित्य दिले. पूर्वी केवळ विद्यार्थी शिकत होते परंतु आता विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंब शिकत आहे. त्यामुळे ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून, विविध भागातून विद्यार्थी, गृहिणी, शिक्षक, डॉक्टर, अधिकारी आदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात असा नवीन आणि कौतुकास्पद पायंडा पडणाऱ्या ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी बद्दल विद्यार्थी, पालकांतून आपल्या प्रतिक्रियांतून स्वागत होत आहे.

चौकट

कोरोना संकटकाळात शिक्षण व्यवस्थेवर कधी झाला नाही असा विपरीत परिणाम झाला. विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून मागील जवळपास दीड वर्षांपासून वंचित राहिले आहेत. शिक्षण व्यवस्थेत काळानुसार होणारे बदल पाहता १० वर्षानंतर जी ऑनलाईन प्रणाली येणार होती ती आज आली आहे. तरी या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक महत्त्वाचे मार्गदर्शन करता येईल यासाठी
ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स ऑनलाईन पद्धतीने घेतला जात आहे. दरम्यान, ऑफलाईन शिक्षण जरी सुरू झाले तरी ऑनलाईन सुरूच राहणार आजपर्यंत आमच्याकडे केवळ विद्यार्थी शिकत होते परंतु आता विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंब शिकत आहे हे अभिमानास्पद आहे.

प्रा. सच्चीदानंद ढगे, संचालक
ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी

प्रतिक्रिया

१) सरांच्या शिकविण्यात जिव्हाळा

ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्यावतीने ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स हा ऑनलाईन पद्धतीने घेतला जात आहे. मात्र, ऑनलाईन क्लास असला तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समोर ठेवूनच प्रा. ढगे सर मार्गदर्शन करतात. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बारीक-सारीक गोष्टीवर सरांचे लक्ष असते. यासंदर्भात ते सूचनाही करतात. आणि हाती घेतलेला विषय अत्यंत जिव्हाळ्याने सर शिकवतात.

  • विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर

२) केवळ विद्यार्थीच नाहीत तर संपूर्ण कुटुंबाला फायदेशीर

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ढगेज् इंग्लिश अकॅडमी ग्रामीण भागातील घराघरात पोहचली आहे. पूर्वी केवळ समोर असलेल्या विद्यार्थ्यांनाच इंग्रजीचे धडे मिळायचे परंतु ढगे सरांच्या कल्पनेतून आता विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबाला, कुटुंबातील सर्व सदस्यांना इंग्रजी शिकण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संस्काराचा वारसा प्रा. सच्चीदानंद ढगे सर आणि प्रा. विवेकानंद ढगे सर हे पुढे चालवत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा.

  • व्यंकट बिराजदार,
    IFS ऑफिसर, गुजरात
    ३) ग्राउंड लेव्हलला जाऊन शिकविले

ज्या विद्यार्थ्यांचे इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्रजी व्याकरण चांगले असेल तर त्या विद्यार्थ्यांना कुठेच काही कमी पडणार आहे. दरम्यान ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी सायंटिफिक रिसर्च करून केलेले मॉडेल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ आणि ग्राउंड लेव्हलला जाऊन त्याच तळमळीने शिकविले जाते. एक चांगला शिक्षक कसा बनला पाहिजे हे प्रा. ढगे सरांकडून शिकावे.

  • डॉ. ओमप्रकाश जाधव, औरंगाबाद

४) मुलं सर्व लक्ष देऊन पाहतात

ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्या ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्सहा मुलं संपूर्ण लक्ष केंद्रित करून ऐकतात. प्रा. ढगे सरांची शिकविण्याची पद्धत अत्यंत चांगली आहे. क्लास दरम्यान विषय समजेल असे उदाहरणे देतात, विद्यार्थ्यांना वर वैयक्तिक लक्ष देतात. सरांनी शिकविलेले चांगल्या प्रकारे लक्षात येत असल्याचे मुलं सांगत आहेत.

  • सुवर्णा पाटील, (पालक) बसवकल्याण

५) शालांत परीक्षा व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभदायक
ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी गेल्या अनेक वर्षांपासून लातूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची जडणघडण करत आहे.
प्रा. सच्चीदानंद ढगे सर आणि प्रा. विवेकानंद ढगे सर हे सध्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना अत्यंत सध्या-सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकवत आहेत. याचा शालांत परीक्षा व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार हे निश्चित. ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी खूप-खूप शुभेच्छा.

  • राम सुरवसे, (APS)
    वसई पोलिस स्टेशन

६) कुटुंबातील सर्वांना मोलाचे मार्गदर्शन

ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीचा ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स हा पूर्ण केला. प्रा. ढगे सरांनी शिकविलेल्या विविध बाबी, उदाहरणे यामुळे मनात इंग्लिश विषयाबद्दल माझी मुलगी संस्कृतीच्या मनातील जी भीती होती ती दुर झाली. त्याचबरोबर प्रा. ढगे सरांनी सलग चार-चार तास जे मार्गदर्शन केले ते अत्यंत मोलाचे आहे. दरम्यान हा क्लास केवळ संस्कृती साठीच नव्हता यात संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शन झाले आणि कुटुंबातील सर्व सदस्यांत ऊर्जा निर्माण झाली.

  • शिवलिंग नागपुरे, (राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक)

७) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाचे

ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्या ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्सच्या माध्यमातून प्रा. ढगे सर जे शिकवत आहेत ते केवळ १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर एमपीएससी, युपीएससी ची तयारी करणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना उपयोगी ठरत आहे. अत्यंत महत्वाच्या नोट्स, एक्झाम पेपर प्रत्यक्षपणे आम्हाला या क्लासच्या माध्यमातून मिळत आहेत.

  • अंजली रत्ने, (प्रथम वर्ष, बीजे मेडिकल कॉलेज, पुणे)

About The Author