अहमदपूर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मागणीला यश

अहमदपूर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मागणीला यश

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांच्याकडे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मागण्यासंदर्भात आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले होते निवेदन शासनाकडून आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ होणार असल्याची रोग्यमंत्र्यांनी घोषणा केली खासदार शरद पवार यांनी संपाची दखल घेतल्यानंतर सकारात्मक तोडगा निघाला.

माफक किमान वेतन आणि कोरोना काळातील कामाचा योग्य भत्ता मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेबांची भेट घेतली होती. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर पवार साहेबांनी एम.के. पाटील यांना सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची भेट घेण्यास सुचविले होते, तसेच सकारात्मक तोडगा काढण्याबाबत त्यांना आश्वस्त केले होते. त्यानंतर आज सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता अशी १५०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. ‘आशा’ वर्कर्सना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम. के. पाटील यांनी यावेळी केली. उद्यापासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचा लाभ राज्यातील ६८ हजार २९७ आशा सेविका आणि ३ हजार ५७० गट प्रवर्तकांना होणार आहे.

About The Author

error: Content is protected !!