अहमदपूर शहरातील विजेच्या विविध प्रश्ना संदर्भात अधिक्षक अभियंता यांच्या समवेत चर्चा
युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महावितरण कार्यालय येथे अहमदपूर शहराच्या प्रलंबीत विविध प्रश्ना संदर्भात महावितरणचे अधिक्षक अभियंता शभोळे यांची दि २३ जुन रोजी भेट घेवून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने दिलेल्या निवेदनाच्या निमित्ताने चर्चा केली.
यात प्रामुख्याने अहमदपूर शहरासाठी नवीन फिडर तातडीने कार्यान्वीत करावे, अहमदपूर शहर कार्यालयाचे विभाजन करून नवीन शहर कार्यालय स्थापन करावे, आयपीडीएस योजनेंतर्गत फ्रीज केलेले कामे(नवीन पोल टाकणे, नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन लाईन ओढणे आदी कामे) पूनर्जीवीत करून मंजूर कामे तातडीने पूर्ण करावेत, शहरात आवश्यक तेथे नवीन पोल बसविणे व वायर ओढून देणे, जिल्हा परिषदशाळेजवळ शंभर चा ट्रान्सफॉर्मर बदलून बसवावा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरचा पोल व स्टे काढणे, मौलाली नगर, उमर काॅलनी, भाग्यनगर येथे नव्याने कांही ठिकाणी पोल बसविणे आदी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, युवा कार्यकर्ते अमजद पठाण, एस.बी.भालेराव आदींनी अधिक्षक अभियंता यांना मागण्याचे निवेदन दिले.
याबाबत अधिक्षक अभियंता भोळे यांनी जेथे नवीन पोल आणी ट्रान्सफॉर्मर ची आवश्यकता आहे त्याचा तातडीने सर्व्हे करावा,महावितरणच्या वतीने तातडीने सेवा द्यावी नागरीकांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, नवीन फिडर चार्ज करण्याच्या कामात बाबत नॅशनल हायवेच्या यंत्रणेकडे पाठपूरावा करावा, अधिकारी कर्मचाऱ्यांनी फोन बंद रहाणार नाहीत याची काळजी घ्यावी, ग्राहकांना तात्काळ व विनम्र संवाद द्यावी आदी सूचना या प्रसंगी केल्या. या वेळी उपकार्यकारी अभियंता काळे प्रदिप, सहाय्यक अभियंता गुडे, अभियंता कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.