रोकडा सावरगाव येथे माझी परसबागची निर्मिती
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद)माझी पोषण परसबाग मोहीमेला १५ जुनपासुन सुरवात झाली असुन तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे दि. २२ जुन रोजी माझी परसबागेची निर्मिती करण्यात आली यासाठी गावपातळीवरील सर्व संसाधन व्यक्तीच्या माध्यमातून पोषण परसबागेची निर्मिती करण्यात आली.सदरील परसबागा तालुक्यातील सर्व गावांमध्ये ऊमेद च्या माध्यमातून सर्व बचत गटाच्या महीलांच्या मदतीने फुलवण्यात येणार आहेत.या मोहीमे अंतर्गत अहमदपूर तालुक्यात १२०० परसबागेची निर्मीतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महीलांच्या आहारात फळभाज्या व पालेभाज्या चा समावेश व्हावा व त्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी परसबागेची निर्मिती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी चांदबी शेख यांच्या घरी परसबागेची निर्मिती करण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलेश राख (तालुका अभियान व्यवस्थापक) अहमदपूर नवनाथ देगनुरे BM-IBCB अरूण वंजारे प्रभाग समन्वयक रोकडा सावरगाव, तसेच प्रभागातील सर्व सिआरपी, कृषी सखी, पशुसखी, बैंक सखी व रोकडा सावरगाव येथील अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होत्या.