कव्हेकरांच्या पुढाकारातून वडीलांचे छत्र हरवलेल्या माणस कन्येचा विवाह सोहळा
सामाजिक बांधीलकी : लग्नाचा खर्च ऊचलून जुळविला संसार…
लातूर (प्रतिनिधी) : समाजामध्ये जीवन जगत असताना सर्वसामान्य वंचीत,पिढीत घटकांचा संबंध आपणाला येत असतो. अशा पिडीतांना आधार देण्याचे काम अनेक लोकप्रतिनिधी करतात. तसेच एका आर्थिक परिस्थितीमुळे खचलेल्या व वडीलांचे छत्र हरवलेल्या विद्या पवार या पदवीधर माणसकन्येचा संसार जुळविण्याचा संकल्प भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केला मुंबईतील एका कंपनीत काम करणार्या रोहीत शिंदे या मुलाशी लग्नाचा योग जुळूनही आला. त्याचा हा विवाह सोहळा नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी गुरूवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्या परिसरात पास्टर सॅम्यिुअल सोनकांबळे व कव्हेकर परिवारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यांनी सामाजिक बांधिलकीतुन स्वखर्चातून करून दिलेला आदर्श विवाहसोहळ्याचा आदर्श इतर लोकप्रतिनिधी व समाजसेवी वृत्तीच्या नागरीकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
खिश्चन समाजातील विद्या पवार या मुलीच्या घरची परिस्थिती हालाखीची अचानक वडीलांचे छत्र हरवले अशा परिस्थितीतही मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी मिळेल ते काम करून आई आणी छोट्या भावाला सांभाळत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतरही चांगली नोकरी मिळेल या प्रयत्नामध्ये बर्याच ठिकाणी मुलाखतीही दिल्या. परंतु चांगल्या नोकरीचा काही योग आला नाही. त्यामुळे आईच्या समोर मुलीचा लग्नाचा विषय आलेला होता. पंरतु गरीबीमुळे चांगला व होतकरू मुलगा मिळेल की नाही. या विचारात आई होती. पंरतु योगायोग घडून आला. भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या संपर्कातील रोहीत शिंदे हा तरूण एका कंपनीमध्ये इंजिनियर पदावर काम करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी मुलीच्या घरची आथिर्र्क परिस्थिती हालाखीची असल्यामुळे लग्नाचा पूर्ण खर्च उचलून माणस कन्या विद्या पवार व मुलगा इंजिनियर रोहीत शिंदे याचा विवाह लावून देण्याचा संकल्प केला. त्या विवाहाला आज मुर्तरूप आलेले आहे. हा विवाह सोहळा नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी गुरूवारी सकाळी ठिक 11.30 वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्या परिसरात भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, श्रीमती. प्रमोदिनी पाटील कव्हेकर, अॅड.आर.आर.गरड,युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, आदीतीताई अजितसिंह पाटील कव्हेकर, रणजीतसिंह पाटील कव्हेकर,जेष्ठ पत्रकार रामेश्वर बद्दर यांच्या उपस्थितीत सपंन्न झाला. त्यांनी सामाजिक बांधीलकीतून घडवून आणलेला विवाह सोहळा इतर लोकप्रतिनिधीसाठी व सामाजिक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
लग्नाचा खर्च उचलल्यामुळे कुटुंबियाला दिलासा
कोरोणाच्या संकटामुळे गाव, तालुका, जिल्ह्यासह राज्याच्या राजधाणीचेही आर्थिक चित्र घसरले असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थिीतही सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी अकाली वडीलांचे छत्र हरवलेल्या ख्रिश्चन कुटुंबातील विद्या पवार या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या खर्च उचलला या विवाह सोहळ्याला मुर्तरूप आले असून हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अशा प्रतिकुल परिस्थितीत दिलेल्या आर्थिक आधारामुळे पवार कुटुंबियांना दिलासा मिळालेला आहे.त्याचा हा सामाजिक बांधीलकीचा आदर्श सध्याच्या परिस्थितीत दिशादर्शक ठरणार आहे.
मानवता हीच जात समजून केला विवाह सोहळा
धार्मिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना मानवता हीच जात समजून हा माणस कन्येचा हा विवाह सोहळा घडून आणला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. माझी अमेरिकास्थित कन्या आश्विनी हीची मैत्रिण विद्या असल्यामुळे माझ्याकडेच तिचे शिक्षण झालेले आहे. त्यामुळे माझ्या मुलीप्रमाणे लळा लागला तिच्या घरची परिस्थिती हालाखीची असतानाही तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. आणि कंपनीमध्ये इंजिनियर पदावर नोकरीवर असणारा मुलगा निवडला. याची माहिती मला मिळताच मानवता हीच जात समजून आम्ही विद्याचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय आज रोजी पूर्णही झाला. याचे समाधान वाटते. त्यामुळे त्यांच्या वैवाहीक वाटचालीस शुभेच्छा अशी भावनाही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी माणसकन्येच्या विवाह सोहळ्यात व्यक्त केली.