देशात आणिबाणी लावणार्या पक्षाने केंद्र सरकारवरती हुकुमशाहीचा आरोप करू नये – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : देशामध्ये काँग्रेस पक्षाने 56 वर्ष सत्ता भोगली त्या राज्यात महाराष्ट्राला मुंंबईसहीत एकभाषीक राज्य करण्याच्या मागणीसाठी शेकडो लोकांना हुकूमशाही पध्दतीने मारण्यात आले.त्या बलीदानानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली. सन 1970 साली विद्यार्थी, जनता यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली लोकाभिमुख न्याय प्रश्नांची मागणी इंदिरा गांधी सरकार करत होते. त्यांना हे सहन झाले नाही. त्यांनी देशावर अराजक बेबंदशाही माजली म्हणून महाकाय हुकुमशाही पध्दतीने आणिबाणी लागू केली, त्या काळात तरूण वृध्द स्वातंत्र्यसैनिक विविध पक्षाचे लोकनेते यांची मुस्कटदाबी करून त्यांना जेलमध्ये दिड वर्ष कोडूंन ठेवले. त्यामुळे अनेक परिवाराचे जीवन उद्ध्वस्त झाले, अशा पक्षाने भ्रष्टाचार्याच्या आर्थिक गैरकारभाराच्या पुराव्याआधारे ईडी कार्यालयाने नोटीसा दिल्या. त्याला हुकुमशाही कृती संबोधून आपली हुकूमशाही कृती झाकणार नाही. त्यामुळे भाजपा सरकारला हुकुमशाही असल्याची टिका करणे योग्य दिसत नाही. काँग्रेस पक्षामध्ये अनेक जेष्ठे नेते लोकशाही पध्दतीने निवणूका घेण्याची मागणी जाहीर करीत असताना हुकुमशाही पध्दतीने पक्ष नियुक्त्या केल्या जातात. हे आम्ही जाणून आहोत. त्यामुळे काँग्रेसने हुकुमशाहीची टिका थांबवावी, असे आवाहन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.