पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या वर्षपूर्ती-निमित्य उत्तरादिमठात अभिषेक

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या वर्षपूर्ती-निमित्य उत्तरादिमठात अभिषेक

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा सांस्कृतिक कार्य मंत्री लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित देशमुख यांच्या मंत्रिपदास एक वर्ष पुर्ण झाले वर्षाची पूर्ती यशस्वीपणे राबवताना कोविड 19 च्या काळात मोठी जबाबदारी त्यानी पार पाडली पुढेही यशस्वीपणे विकासाच्या वाटेवर लातूर जिल्ह्याचा आलेख सतत तेवत राहावा यासाठी लातूर जिल्हा माध्यम कॉंग्रेस विभागाच्या वतीने लातूरातील श्री उत्तरादीमठात श्री नृसिह देवताला महाअभिसेक व सायंकाळी आरती गुरुवारी मान्यवरांच्या उपस्तीतित करण्यात आली.

यावेळी यजमान म्हणून नुतन कॉंग्रेस चे माध्यम विभागाचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन एस आर देशमुख, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, स्वामी रामानंद तीर्थ विध्यापिठ नांदेड चे माजी अधिस्ठाता तथा प्राध्यापक प्रदिप देशमुख, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ, कॉंग्रेस सोशल मीडिया चे अहमदपूर विधान सभा अध्यक्ष राजकुमार पाटील, उपस्तीत होते.

याप्रसंगी उत्तरादिमठात पंडित रघुत्तमाचार्य जोशी यांनी आशिर्वचन केले उपस्तीत सर्व पाहुण्याचा पंडित रघुत्तमाचार्य जोशी यांच्या हस्ते मठाच्या वतीने वस्त्र व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी माध्यम जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व आभार मानले आरती सोहळ्यास पंडीत श्रीपाद हलगरकर, भानुदास भाताम्ब्रेकर, बाळासाहेब देशपांडे, प्रविण देशपांडे, अभियंता बेंडे, संजय निलेगावकर, पत्की आदी मान्यवर उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!