महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा युमोची निदर्शने

महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा युमोची निदर्शने

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु आजूनही त्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे या निष्क्रिय महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गांधी चौकामध्ये आंदोलन करून त्या घटणेचा निषेध व्यक्‍त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेश सरचिटणीस दत्ता चेवले, प्रदेश कार्यकारीनी सदस्य रविशंकर केंद्र, शहर सरचिटणीस गणेश गोजमगुंडे सरचिटणीस सागर घोडके, युवती मोर्च्याचे अध्यक्षा पुनम पांचाळ, भाजपा युमोचे उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, गिरीष तुळजापूरे, संतोष पांचाळ, शहर चिटणीस ओम धरणे, आदित्य कासले, शैलेश बिराजदार, आकाश बजाज, गोविंद सुर्यवंशी यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!