चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून लातूर भाजपा युवा मोर्च्याच्या कार्याचा आढावा

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून लातूर भाजपा युवा मोर्च्याच्या कार्याचा आढावा

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपा युवा मोर्च्याचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लातूरात झालेल्या बैठकीमध्ये लातूर भाजपा युवा मोर्च्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुकही माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले.

यावेळी झालेल्या या आढावा बैठकीमध्ये विविध ठिकाणी झालेल्या संघटनात्मक कामाची चर्चा करण्यात आली. तसेच काही विषयावर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शनही झाले. यामध्ये सध्याची पक्षीय परिस्थिती व पुढील वाटचालीची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख भाजपा लातूरचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, भाजपा युमोच्या प्रदेश चिटणीस प्रेरणाताई होणराव भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य दत्ता चेवले, रविशंकर केंद्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author