अवैध दारुची चोरटी वाहतुक करणा-या वाहनांवर कारवाई
पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या विशेष पथकाची कारवाई
लातूर (प्रतिनिधी) : निखील पिंगळे पोलीस अधिक्षक, लातूर यांचे आदेशाने अवैध धंदयाना आळा घालण्यासाठी विशेष मोहीमे अतर्गत विशेष पथकातील पोलीसांनी लातुर शहरात चार ठिकाणी अनाधिकृतरित्या विनापास परवाना विदेशी दारुची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतुक करणा-या इसमांवर कारवाई करण्यात आली. ज्यात ५ इसमांसह १ जीप, ३ दुचाकी व ४७,०१५ विदेशी दारु असा एकुण ७,५७,०१५ रुपयाचा मुद्येमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक ३१.१२.२०२० रोजी लातुर शहरात गुप्त माहीती काढुन १३.३० वा सुमारास शिवाजी चौक ते गांधीचौक जाणारे रोडने विनापासपरवाना बेकायदेशीररित्या विदेशी दारुच्या बाटल्या घेवुन जाणा-या क्रुझर जिप क्रमांक एम एच २४ व्हि ९४६२ वाहनास तहसील कार्यालय,लातूर समोरील रोडवर थांबविले असता. सदरील वाहन चालक इसम नामे रविकांत मल्लिकार्जुन मठदेवरु (स्वामी ) वय ३२ वर्ष रा. कवठाळा हा स्वताःचे आर्थिक फायदयासाठी अनाधिकृतरित्या विनापास परवाना विदेशी दारुची चोरटी विक्री व्यवसाय करीता वाहतुक करीत असताना मिळुन आला. त्याचे ताब्यातुन मॅकडॉल नंबर १, ब्लॅक डिलक्स व्हिस्की अशा वेगवेगळया कंपनीच्या ९० मिली विदेशी दारुच्या बाटल्या किमंत ४०३०/- रुपये, क्रुझर जिप किमंत ५,००,०००/रुपये असा एकुण ५,०४०३० रुपयाचा मुद्यमाल जप्त केला. सदरची विदेशी दारु जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टे शिवाजीनगर, लातूर येथे कलम ६५ ( अ) (इं) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असुन, अधीक तपास शिवाजीनगर, लातूर पोलीस करीत आहेत.
२) दिनांक ३१.१२.२०२० रोजी लातुर शहरात गुप्त माहीती काढुन १५.०० वा सुमारास गांधीचौक ते शिवाजीचौक जाणारे रोडने विनापासपरवाना बेकायदेशीररित्या विदेशी दारुच्या बाटल्या घेवुन जाणा-या स्कूटी क्रमांक एम एच २४ ए.क्यु. ४९८६ वाहनास शिवाजी चौक रोडवर थांबविले असता. सदरील वाहन चालक इसम नामे श्रीहरी तुकाराम बोयने वय ३५ वर्ष रा. कव्हा ता.जि.लातूर हा स्वताःचे आर्थिक फायदयासाठी अनाधिकृतरित्या विनापास परवाना विदेशी दारुची चोरटी विक्री व्यवसाय करीता वाहतुक करीत असताना मिळुन आला. त्याचे ताब्यातुन रॉयल स्टैंग, ब्लेंडर्स प्राईड अशा बेगवेगळया कंपनीच्या ९० मिली विदेशी दारुच्या बाटल्या किमंत १६,०९५/-रुपये, स्कुटी किमंत ६०,०००/रुपये असा एकुण ७६,०९५ रुपयाचा मुद्येमाल जप्त केला. सदरची विदेशी दारु जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टे शिवाजीनगर, लातूर येथे कलम ६५ ( अ) (ई ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून, अधीक तपास शिवाजीनगर, लातूर पोलीस करीत आहेत.