गुरुवारी बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन शिबिर
उदगीर(एल.पी.उगीले):- धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य आणि सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेनुसार तथा जनसंदेश,जन भागीदारी व जन आंदोलन फॉर जन आरोग्य अँड भूमी आरोग्य आणि तसेच आयुर्वेदा फॉर वन हेल्थ व हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद या मोहिमेअंतर्गत जन्मापासून ते 16 वर्ष वयोगटाच्या बालकांमध्ये शारीरिक,मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा त्वचेची कांती वाढविण्यासाठी मोफत सुवर्णप्राशन (बाल रसायन घृतपान) एक आयुर्वेदिक लसीकरण हे शिबिर गुरूवार, दिनांक 22/02/2024(पुष्य नक्षत्र दिवस) रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 04.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.सुवर्णप्राशन केल्यामुळे बालकांच्या शरीरात इम्युन सेल्स व टी-सेल्स वाढतात,रोगप्रतिकारक्षमता वाढते,शरीरामध्ये कसलेही मेटाबाॅलिक बदल न होता त्याचा मुलांच्या पोषणामध्ये लाभ होतो, असे सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.
तरी या मोफत सुवर्णप्राशन शिबिराचा पालकांनी त्यांच्या बालकांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन प्राचार्य तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय वि.पाटील,डॉ.मंगेश मुंढे, डॉ.राजेंद्र धाटे,डॉ.उषा काळे,डॉ.रविकांत पाटील,डॉ.अस्मिता भद्रे,डॉ.शिवकुमार होटुळकर,डॉ.शिवकुमार मरतुळे, डॉ.अवतारसिंग मिस्त्री यांनी केले आहे.