जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद लातूर प्रशासनाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पु- रस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२२-२३ मध्ये केलेल्या कामांचे मूल्यांकन करून या पुरस्कारासाठीची नावे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केली आहे. यात तालुक्यातील सुनीलदत्त कांबळे, ईब्राहिम शेख, संदिप शिरूरे व रवींद्र कुटवाडे यांची निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे रहाणीमान उंचावल्यास मदत करणाऱ्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्क ार दिले जातात. तालुक्यातून चार ग्रामसेवकांची निवड समितीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी केली आहे.
कांबळे, शेख, कुटवाडे, शिरूरे यांची निवड लवकरच करण्यात येणार वितरण यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुनीलदत्त कांबळे (ग्रामसेवक उमरदरा), ईब्राहीम शेख (ग्रामसेवक सुमठाणा), रवींद्र कुटवाडे (ग्रामसेवक सय्यद अंकुलगा), संदिप शिरूरे (ग्रामसेवक कानेगाव) या चार ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच एका कार्यक्रमात त्यांना सन्मान पूर्वक या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल गटविकास अधिकारी बी. टी.चव्हाण, एबीडिओ शिवाजीराव यमुलवाड, विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे, कक्षाधिकारी चंद्रकांत कदम, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.एस.एकोर्गे, उपाध्यक्ष डि.जी. बोयने, कार्याध्यक्ष चंद्रकांत हुडगे, महिला उपाध्यक्ष वर्षा जाधव, कोषाध्यक्ष अनिल जाधव, सहसचिव बालाजी मलवाड, प्रसिद्धी प्रमुख सुभाष सिरसाट, संघटक गुणवंत खसबे, महिला संघटक आशालता तोटे, बी.जी. पठाण, पी.पी. कदम, पी.आर.वाघमारे, एस.एस. स्वामीवखे, जी. सय्यद, पी.आर. सय्यद, एस.डी. राजे यांच्यासह पं. स.अधिकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.