वटवृक्षाचे ऋणनिर्देश सोहळा करत केली आगळी वेगळी वटसावित्री पौर्णिमा साजरी

वटवृक्षाचे ऋणनिर्देश सोहळा करत केली आगळी वेगळी वटसावित्री पौर्णिमा साजरी

लातूर (प्रतिनिधी) : आज वटसावित्री पौर्णिमा,आजच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने महिला दरवर्षी ही पौर्णिमा साजरी करत असतात, गेली 3-4 वर्ष आम्ही देखील यानिमित्ताने आजच्या दिवशी वेगळ्या संकल्पना राबवत असताना. ज्या वटवृक्षाची पूजा प्रत्येक वर्षी केली जाते, त्या वटवृक्षाचा ऋणनिर्देश सोहळा करण्याची संकल्पना आली,व दरवर्षीच्या प्रथेला फाटा देत आगळी वेगळी संकल्पना राबविण्याचा मनोमन निश्चय केला व माझे माहेर असलेल्या खाडगाव येथील वटवृक्ष जो किमान 3 शतकापासून उभा आहे त्याची निवड केली. हा वटवृक्ष अनेक इतिहासाचा मोठा साक्षीदार आहे,या वटवृक्षाने अनेक वटसावित्री पौर्णिमा पहिल्या आहेत व आज देखील पाहत आहेत.साधारणतः आपणाला देखील याच दिवशी वटवृक्षाची आठवण येते, म्हणून फक्त आपण पूजा न करता वटवृक्षाचा एका प्रकारे सत्कार ऋणनिर्देश सोहळ्याच्या निमित्ताने केला. ज्यात वटवृक्षाला वस्त्र परिधान करून, फुलांचा हार अर्पण केला. व सर्व महिलांनी मिळून पूजा केली. दरवर्षी वेगळी संकल्पना राबवत त्यातून एक आगळा वेगळा संदेश देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो, ज्याला समाज सकारात्मक घेतो याचा आम्हाला आनंद असून आज इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वटवृक्षाचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हा महिलांना मिळाले यांचे समाधान खूप मोठे आहे.
रागिणी सतीश यादव,
नगरसेविका, प्रभाग 11,
शहर महानगरपालिका, लातूर.

About The Author