मिडीया आमचा, आवाज कोणाचा? – मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, मुंबई

0
मिडीया आमचा, आवाज कोणाचा? - मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, मुंबई

मिडीया आमचा, आवाज कोणाचा? - मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, मुंबई

लोकशाहीचा चौथास्तंभ असणारे प्रसार, प्रचारमाध्यम हे त्रेयस्त न राहता सत्ताधाऱ्यांच्या अधिपत्याखाली असणे हे लोकशाहीसाठी घातक

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या मुख्य प्रवाहातील मिडीया हा श्रीमंताचे बटीक व सत्ताधाऱ्याच्या अधिपत्याखाली असणे हे लोकशाही ला घातक असुन सामान्य माणसाचा आवाज मिडीयामधुन गायब झालेला आहे. म्हणून इतर लोकमाध्यमे फेसबुक, युट्यूब, वॉट्सअप याचाच सामान्य माणसांना आधार झालेला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमे हे बटीक झाल्यामुळे मिडीया आमचा, आवाज कोणाचा? असा प्रश्न समोर येत असल्याचे चित्र आज समाजात दिसत आहे असे मुक्तपत्रकार शर्मिष्ठा भोसले या म्हणाल्या.
त्या अहमदपूर येथील संस्कृती गार्डनमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व समविचारी संघटनाच्या वतीने गेल्या १८ वर्षापासून आयोजित जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना मिडीया आमचा; आवाज कुणाचा ? या विषयावर बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, निवडणूकांच्या तोंडावर अफवांचा प्रचार -प्रसार होतो. मॉडर्न तंत्रज्ञानाचा वापर करून अफवा पसरवणे, दंगलीचे मुळ सुरुवात सोशल मिडीयातील फेक मॅसेज व इडिटींग केलेल्या व्हीडीओ मधुन होतो. एका त्रयस्त संस्थेच्या संशोधनातुन २०१४ पासुन मिडीयाच्या स्वातंत्र्यात घट झाली आहे. मिडीया ओनरशिप वाढलेली असुन माध्यम स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्यात पत्रकारांना धमकावणे, महिला पत्रकारांचे चारित्र्य हणन करणे, बलात्कार व वैयक्तीक माहीती सार्वजनिक करण्याची धमकीही दिली जाते. फेसबुक, ट्विटर, वॉट्स अप, युट्यूब अशा सोशल मिडीयावरील अकौंटवर कार्यवाही करून ती बंद केली जातात. खरी माहीती जनतेला दिली जाऊ देत नाहीत जात, धर्म, वर्ण, पुरुषी संस्कृती या बाबींना अधिक महत्व दिले जात आहे म्हणून त्यास सोशल मिडीयाशी समसमान असलेला पॅरलल मिडीया जनतेचा आवाज बनत आहे. समाजाने माध्यमा विषयी साक्षर बनने गरजेचे आहे. फेक न्युज ओळखता येणे व तसेच माहीतीची सत्यता पडताळता येणे काळाची गरज आहे. निवडणूकांच्या तोंडावर सजग मतदार बनणे गरजेचे आहे.
मिडीया आमचा आणी आवाजही जनतेचाच हवा असेल तर आपल्या येणाऱ्या पिढीला मेडीकल, इंजिनिअरींग तसेच इतर ग्लॅमरस साईड सोडून पत्रकारीता / मिडीया क्षेत्रात उतरणे नितांत गरजेचे असल्याचेही श्रीमती भोसले म्हणाल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सत्यनारायण काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर लांडगे, सुत्रसंचलन रमाकांत टेकाळे व शिंदे, व्याख्यातेचा परिचय जि.प. शिक्षिका जयश्री पवार यांनी तर आभार साधना लोहकरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *