पोखरा योजनेअंतर्गत वडारवाडी तालुका अहमदपूर येथे पेरणीपूर्व महिला शेतीशाळा संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे ) : कृषी विभाग महाराष्ट्र शासन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत सोयाबीन + तूर या पिकावर शेतीशाळा घेण्यात आली सदर शेतीशाळा मध्ये माहिती सांगताना शेतीशाळा प्रशिक्षक शरद हुडे यांनी पेरणीपूर्व शेती शाळेची माहिती सांगताना 75 ते 100 mm पाऊस पडल्यानंतर शेतकर्यांनी पेरणी करावी. जमिनी नुसार योग्य वाणांची निवड करावी, ऊगवण क्षमता चाचणी तपासूनच बियाणे पेरणीसाठी वापरावे. BBF यंत्राद्वारे पेरणी करावी यामुळे बियाण्यात बचत होते खताची बचत होते व पीक उत्पादनामध्ये वाढ होते पाऊस कमी झाल्यास किंवा पावसाचा खंड पडल्यास पीक तग धरू शकते. किडी व रोगाचे प्रमाण कमी होते. यासाठी bbf ने पेरणी करावी , ऊगवण क्षमता चाचणी तपासूनच पेरणी करावी व तसेच प्रात्यक्षिक दाखवत तसेच बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी याबद्दल ही प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. प्रयोगशील शेतकरी रेणुका बापूराव चव्हाण यांच्या शेतात BBF वर सोयाबीन पेरणी करण्यात आली.महिला बचत गटांना ही मार्गदर्शन करण्यात आले. गावांमधील तीन बचत गट असुन यामध्ये 1. उन्नती महिला बचत गट अध्यक्ष आशाबाई विठ्ठल अमुगे, सचिव अन्नपूर्णा विठ्ठल अमुगे 2. तुळजाभवानी बचत गट अध्यक्ष गंधारबाई तुकाराम अमुगे, सचिव शिवमला अमुगे तसेच 3. जय मल्हार बचत गट अध्यक्ष उज्वला राजकुमार अमुगे . शेतकरी गट जय सेवालाल शेतकरी बचत गट अध्यक्ष पंडित घेणा चव्हाण, सचिव मारुती घेना चव्हाण व उपस्थित गटातील सर्व सदस्य महिला कृषी मित्र बापूराव चव्हाण ,कृषी ताई रेणुका चव्हाण तुकाराम अमुगे ग्रामपंचायत माजी सदस्य, वंदना अमूगे ग्रामपंचायत सदस्य तसेच सावित्राबाई चव्हाण, अहिल्याबाई हाके, प्रतिभा अमुगे, उत्तम चव्हाण, गंगाराम हाके, लक्ष्मी अमुगे, गिरजाबाई हाके इत्यादी शेतकरी व महिला उपस्थित होते.