काँग्रेसने सत्तेसाठी तर भाजपाने सर्वसामान्‍याच्‍या हितासाठी काम केले – आ. रमेशआप्पा कराड

काँग्रेसने सत्तेसाठी तर भाजपाने सर्वसामान्‍याच्‍या हितासाठी काम केले - आ. रमेशआप्पा कराड

लातूर (एल पी उगीले) : काँग्रेसने लोकशाहीचा खून करून २५ जून १९७५ साली देशात आणीबाणी लागू केली. खऱ्या अर्थाने काँग्रेसने केवळ कुटूंबासाठी, स्‍वार्थासाठी आणि सत्‍तेसाठीच काम केले, तर भारतीय जनता पार्टी सर्वसामान्‍यांच्‍या हितासाठी काम करीत असल्‍याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जिल्‍हा भाजयुमोच्‍या वतीने आयोजित आणीबाणीच्‍या लढयातील आंदोलकाच्‍या सन्‍मान कार्यक्रमात बोलताना केले.   

         इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ साली देशात आणीबाणी लागू करून देशभर अत्‍याचार आणि दडपशाही सुरू केली. सत्‍तेचा व बळाचा वापर करून मानव अधिकाराचे त्‍याचबरोबर अभिव्‍यक्‍ती  स्‍वातंत्र्याचे हनन केले. लाखो देशवाशीयांना तुरूंगात डांबले, या काळया कर्तृत्‍वाची तरूण पीढीला माहिती व्‍हावी. यासाठी जिल्‍हा भाजयुमोच्‍या वतीने आणीबाणीच्‍या काळात काँग्रेस सरकार विरूध्‍द संघर्ष केलेल्‍या आंदोलकांचा जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या हस्ते भारत मातेची प्रतिमा देऊन सन्‍मान करण्‍यात आला. यावेळी भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे, प्रा. विजय क्षीरसागर, भाजयुमोच्‍या प्रदेश प्रवक्‍त्‍या प्रा. प्रेरणा होनराव, जिल्‍हाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर चेवले, प्रदेश भाजयुमोचे गणेश गोमसाळे, ललिता जाधव, गणेश गवारे, सरचिटणीस तानाजी बिरादार, अभिजीत मद्दे, राजकिरण साठे, संजय मुसळे, धनराज शिंदे, कुलभूषण संपत्‍ते यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाराष्‍ट्र  टाईम्‍सचे जेष्‍ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी आणीबाणीच्‍या कटू अत्‍याचाराची सविस्‍तर माहिती ऑनलाईन व्‍याख्‍यानातून दिली.

          या कार्यक्रमात लोकतंत्र सेनानी संघाचे जिल्‍हाध्‍यक्ष आप्‍पाराव कुलकर्णी यांनी आणीबाणीच्‍या  काळातील आढवणींना यावेळी उजाळा दिला. प्रारंभी प्रा. प्रेरणा होनराव यांनी प्रास्‍ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तानाजी बिरादार यांनी केले. तर   अभिजीत मद्दे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

        यावेळी आप्‍पाराव कुलकर्णी, अशोक मठपती, ज्ञानेश्‍वर रसाळ, विजयकुमार धाराशिवे, महादेव कावळे, अरूण देशपांडे, नारायण मिंड, हरीगोविंद ममदापूरे, तुळशीदास सपाटे, चंद्रकांत मलवाडे, सिद्राम ईळेकर, नागनाथ गौर, सोपान मंडाले, पंढरीनाथ तळेकर, निवृत्‍ती मलवाडे, वसंत कुलकर्णी, शिवरूद्र धाराशिवे आदी आणीबाणीच्‍या विरोधात काम केलेल्‍या आंदोलकांचा, सत्‍याग्रह केलेल्‍या व्‍यक्‍तींचा भारत मातेची प्रतिमा देवून सन्‍मान करण्‍यात आला.

About The Author