हकनकवाडी येथे १० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील हकनकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला, सिमेंट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन २ मार्च रोज शनिवारी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम देवर्जनकर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा.श्याम डावळे,गुडसुरचे सरपंच बालाजी देमगुंडे,यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले, यावेळी हकनकवाडीचे सरपंच सुग्रीव पवार,नागनाथ चोले, तातेराव पाटील,माधव केंद्रे,संग्राम पवार,प्रशांत राठोड, प्रकाश पवार,बाबुराव यात्रे,बालाजी पवार,परशराम मुंढे,बालाजी कार्लेवाड आदी नागरिक उपस्थित होते.