मातृभूमी नर्सिंग स्कूल मधील विद्यार्थ्याना पोलिओ लसीकरण प्रशिक्षण
उदगीर (एल.पी.उगीले) : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत प्रत्यक्ष कार्यासाठी प्रथमच विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे . संपूर्ण राज्यात आशा कार्यकर्ती यांचा संप असल्यामुळे शुक्रवार पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जी. एन. एम. आणि ए. एन. एम. च्या विद्यार्थ्याना तालुका आरोग्य विभाग मार्फत पोलिओ लसीकरण बाबत मातृभूमी नर्सिंग स्कूल येथे प्रशिक्षण देण्यात आले .
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उदगीर मार्फत मातृभूमी नर्सिंग स्कूल उदगीर येथे पोलिओ लसीकरण प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत कापसे, पर्यवेक्षक व्ही एम गुडमेवार, आरोग्य सेवक अनिल सांगवे यांनी बालकांना लस कशा पद्धतीने पाजायची आहे, करंगळीला शाई लावणे, बालकाची नोंद याबाबत प्रशिक्षण दिले. यावेळी प्राचार्य उषा कुलकर्णी, प्रा रेखा रनक्षेत्रे, प्रा बिभीषण मद्देवाड, आकाश राठोड, राहुल जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.