उदयगिरीत विज्ञान परिषदेतर्फे विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के होते, तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मराठी विज्ञान परिषद अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, उपाध्यक्ष प्रा.डॉ. राहुल अल्लापुरे, प्रा.डॉ.मल्लेश झुंगास्वामी, सचिव प्रा.डॉ.बी.डी.करंडे, सहसचिव प्रा.प्रवीण जहुरे यांची उपस्थिती होती. परिषदेच्या वतीने गणित विभागाच्या पुढाकाराने राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर 2023 रोजी साजरा झाला होता. मराठवाडा विभागीय स्तरावर मराठवाडा गणित परिषद औरंगाबाद, यांच्यातर्फे रामानुजन गणित स्पर्धेत तृतीय स्नेहा नामवाड, द्वितीय ओमकार स्वामी यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले पूजा कोळी, स्नेहा बिरादार, नम्रता टाकळे यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, जिद्द, सातत्य असावे लागते. डॉ.झुंगा म्हणाले स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याची मानसिकता असावी लागते. समारोपात डॉ.मस्के म्हणाले स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी चांगल्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन,अभ्यास, निरीक्षण व कल्पनाशक्ती हवी. सूत्रसंचालन परिषदेचे सचिव प्रा. डॉ.बी.डी.करंडे यांनी केले तर आभार प्रा.पी.पी.वाघमारे यांनी मानले.