लातूरात आ. संभाजीराव निलंगेकर; आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे चक्काजाम

लातूरात आ. संभाजीराव निलंगेकर; आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे चक्काजाम

लातूर (प्रतिनिधी) : घटनेने दिलेले ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण सन्मानाने परत मिळावे या मागणीसाठी भाजपाचे नेते माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल चार तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध जातीतील ओबीसी समाज बांधव पारंपारीक वेषभूषा आणि वाद्यवृंदासह सहभागी झाले होते. न्‍याय मागण्‍यासह आघाडी शासन विरोधी गगनभेदी घोषना देवून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहिल असे यावेळी बोलून दाखविण्‍यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्‍या जयंती निमित्‍ताने रद्द झालेले ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळावे यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या चक्‍काजाम आंदोलनात भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ओबीसी समाजातील बारा बलुतेदार, आलुतेदार, बंजारा समाजातील पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला, धनगर समाजातील पारंपारिक वाद्यांसह बांधव, वासुदेव, आराधी, गोंधळी, पोतराज, वाघ्या मुरळी आदी लहान लहान जातीतील बांधवांनी आपल्‍या पारंपारीक वेशभूषेत सहभागी झाले होते. सकाळी आकरा वाजता सुरू झालेले चक्काजाम आंदोलन तब्बल चार साडेचार तास चालू राहीले. यादरम्यान आरक्षण आमच्‍या हक्‍काचे नाही कोणाच्‍या बापाचे, बारा बलुतेदारांना आरक्षण मिळालेच पाहिजे, वसुली सरकार हटाव, ओबीसी बचाव, हक्‍काचे आरक्षण द्या नाहीतर खुर्च्‍या खाली करा, आघाडी शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी, ओबीसी के सन्‍मान मे, भाजपा मैदान मे अशा अनेक घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. अनेक आंदोलन कर्त्‍याच्‍या हातात विविध मागण्‍यांचे फलक आणि भाजपाचे ध्‍वज दिसत होते.
ग्रामीण भागातून ओबीसी समाज बांधव आपल्‍या न्‍याय हक्‍काच्‍या मागणीसाठी वाजत गाजत या चक्‍काजाम आंदोलनात सहभागी झाले होते. यापुढील कोणत्‍याच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूकीला उभा राहता येणार नाही याची चीड आघाडी शासनाविरूध्‍द व्‍यक्‍त करीत असताना दिसत होते. पारंपारीक वेषभूषा आणि वाद्यांसह सहभागी झालेल्‍या या ओबीसी घटकातील बांधवांनी आंदोलनाच्‍या ठिकाणी आपले पारंपारीक गीत, नृत्‍य सादर केले. वासुदेव आला वासुदेव आला ओबीसी आरक्षणाचे दान पाऊ दे, आला रे आला वासुदेव आला या वासुदेवाच्‍या गीताला उपस्थितांनी मोठी दाद दिली. यावेळी पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर, संत गाडगेबाबा महाराज, संत तुकाराम आदीसह विविध राष्‍ट्रपुरूषांचे जिवंत देखावे अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

लातूरात आ. संभाजीराव निलंगेकर; आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे चक्काजाम

ओबीसी समाजाच्‍या या आंदोलनाला सर्व समाजाचा पाठींबा असल्‍याचे सांगून यावेळी बोलताना भाजपाचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर म्‍हणाले की, ओबीसी समाजाच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता भाजपा सरकारने मराठा आरक्षण दिले होते. राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात गृह, आरोग्‍य, कृषी यासह विविध विभागात मोठा भ्रष्‍टाचार झाला असून हा भ्रष्‍टाचार लपविण्‍यासाठी जाणीवपूर्वक भावनीक प्रश्‍न निर्माण केले जात आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण न्‍यायालयात व्‍यवस्थित बाजू मांडली नसल्‍याने रद्द झाले. या दोन्‍ही समाजाला आरक्षण मिळावे ही भाजपाची भूमीका आहे. जोपर्यंत हे हक्‍काचे आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपाचा हा संघर्ष चालूच राहील असा इशारा दिला.

जेंव्‍हा जेंव्‍हा लातूरवर संकट आले तेव्‍हा आम्‍ही रस्‍त्‍यावर आलो घरात बसून राहीलो नाही. जिल्‍हयाचे सत्‍ताधारी नेते लातूरवर कोरोनाचे मोठे संकट आले तेंव्‍हा कुठे होते असा प्रश्‍न उपस्थित करून प्रत्‍येक दवाखान्‍यात आणि अडचणीत संकटात सापडलेल्‍या गोरगरीब जनतेला भाजपा कार्यकर्त्‍यांनी जेवणाचे डब्‍बे  दिले, राशनचे किट वाटप केले, अनेकांना मदत केली आधार दिला असे सांगून आ. संभाजीराव निलंगेकर म्‍हणाले की, भाजपाच्‍या आंदोलनाची धसकी घेवून कॉग्रेसच्‍या बोटावर मोजण्‍या इतक्‍या लोकांनी ओबीसी आरक्षण प्रश्‍नी फोटोगिरीसाठी आंदोलन केले. कॉग्रेसला समाजाचे काहीही घेणे देणे नाही. हिंम्‍मत असेल तर लातूर ग्रामीणच्‍या आमदाराने राजीनामा देवून निवडणूकीला सामोरे जा, जनता तुम्‍हाला तुमची जागा दाखविल्‍याशिवाय राहणार नाही.

स्‍व:ताला जाणते राजे समजणारे पावसात भिजले, तेव्‍हा जनतेने विश्‍वास ठेवून साथ दिली. सत्‍तेवर आले त्‍यांच्‍या महाविकास आघाडी सरकारने मराठा आणि ओबीसीचे आरक्षण घालविले, एस.सी., एस. टी ची पदोन्‍नती थांबविली. रद्द झालेले आरक्षण परत मिळाले नाही तर सत्‍तेची खूर्ची खेचून घेतल्‍याशिवाय ओबीसी समाज स्‍वस्‍थ बसणार नाही. असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात शेतकरी, कष्‍टकरी, दिनदलित, गोरगरीब आणि कोणताच समाज समाधानी नाही. नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वात केंद्र शासनाने सर्वसामान्‍यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना सुरू केल्‍या. त्‍याचा लाभ तळागाळातील माणसाला होत असल्‍याची माहिती दिली.

पालकमंत्री कसा असावा हे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वेगवेगळया विकासाच्‍या योजना मंजूर करून आणि विविध प्रकल्‍प कार्यान्‍वीत करून दाखवून दिले आहे. कॉग्रेसवाल्‍यांना साधी मुतारी सुध्‍दा बांधली नाही असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, पैशाच्‍या जोरावर उमेदवारी मिळू शकते मात्र गोरगरीबांचा आशिर्वाद मिळू शकत नाही. लातूर ग्रामीणचे आमदार कोणाच्‍या विरोधात निवडूण आलेत ? नोटाच्‍याच ना. येणा-या निवडणूकीत गोरगरीब सर्वसामान्‍य जनतेच्‍या आशिर्वादाने तूमची पाठ लावल्‍याशिवाय राहणार नाही असे बोलून दाखविले.
या प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, देविदास काळे, भागवत सोट, स्वाती जाधव, प्रेरणा होनराव, व्यंकट पन्हाळे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे सुत्रसंचलन शैलेश गोजमगुंडे यांनी केले यावेळी भाजपाचे शैलेश लाहोटी, प्रदीप पाटील खंडापूरकर, मनीष बंडेवार, अजित पाटील कव्हेकर, दिग्विजय काथवटे, विजय काळे, गोविंद नरहरे आदी व्यासपीठावर होते. तब्‍बल चार साडेचार तासानंतर आंदोलनकर्त्‍यांना पो‍लीसांनी अटक करून सोडून दिले.

About The Author