महाराष्ट्र स्टुडेंट फेडरेशन च्या मागणी ला यश विलंब शुल्क विद्यापीठाने माफ केले
लातूर (प्रतिनिधी) : व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कागदपत्रे पुर्ततेसाठीमुदतवाढ देऊन विलंब शुल्क माफ करावे असे निवेदन संघटनेतर्फ देण्यात आले होते. कोरोना सारखी जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर मुळात प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला होता. व विद्यापीठाने कागद पत्र जमा करण्यसाठी दिलेल्या वेळात संपूर्ण राज्यात ताळेबंद होती त्यामुळे विद्यार्थी वेळेवर कागदपत्र जमा करू शकले नाहीत. त्यामुळे संबंधित महाविदयलायकडून विलंब शुल्क आकारले जात होते. हा निर्णय अन्यायकारक होता म्हणून. महाराष्ट्र स्टूडेंट फेडरेशन च्या वतीने विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथील संचालक डॉ. राजेश शिंदे यांना निवेदन देऊन हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मागणीला यश मिळाले. यावेळी फेडरेशन चे अध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष- श्याम डोंपले, नितीन हासाळे, दत्ता शिंदे, सचिन झेंटे, भीमाशंकर सुगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.